महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत जाहीर भाषण करून पुन्हा धुरळा उडवून दिला आहे. मराठी म्हणजे नक्की कोण, इथपासून ते मुंबई आणि महाराष्ट्रात नोकरी कोणाला मिळाली पाहिजे, इथपर्यंतचे अनेक प्रश्न उपस्थित करीत त्यांनी स्वतःच त्याची उत्तरे दिली आहेत. एका वर्षाच्या अंतराने शिवाजी पार्कवर झालेल्या दोन भाषणांनी राज यांना महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये ओळख मिळवून दिली आहे.
राज ठाकरे यांचा राजकारणातील प्रवास हा भारताच्या राजकारणातील घराणेशाहीच अधोरेखित करणारा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतरच्या काळात त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्या घरात राजचा जन्म झाला. लहानपणापासूनच राज वडिलांइतकाच काकांच्याही प्रभावाखाली होता. शिवसेनेच्या उभारणीचा तो काळ होता. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा या विचाराने आणि बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव नेते असे मनापासून मानणाऱ्या "शिवसैनिकां'मुळे शिवसेनेने मुंबई महापालिकेतील सत्ता मिळविली आणि त्यानंतर पाठोपाठ संपूर्ण राज्यामध्ये विस्तार करण्यास प्रारंभ केला होता. 1984 नंतर देशाचे राजकारण हिंदुत्वाभोवती फिरू लागले आणि शिवसेनेचा प्रसारही वेगाने वाढू लागला. याच काळात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज दिसू लागले होते. जे. जे. कला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवी पूर्ण केल्यानंतर, राज्याच्या दौऱ्यांमध्ये तर कधी दसरा मेळाव्यात व्यासपीठावरील राजकडे पाहून अनेकांना शिवसेनेच्या स्थापनेपूर्वीचे बाळासाहेबच आठवू लागले.
त्यानंतर राज यांना शिवसेनेच्या विद्यार्थी विभागाचा- भारतीय विद्यार्थी सेनेचा- प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. याच कालावधीमध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केल्यामुळे दुखावलेल्या बाळासाहेबांनी राज आणि उद्धव यांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाऊ लागले; पण तोपर्यंत बाळासाहेबांचा कोणताच मुलगा शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसत नव्हता. त्यामुळे राज हाच बाळासाहेबांचा राजकीय वारसदार असणार, अशी चर्चा सुरू झाली होती. राज यांचे दिसणे, "ठाकरी' शैलीतून भाषण करणे आणि व्यंगचित्रे काढणे या सर्वच गोष्टी त्याला अनुकूल होत्या. पाहता पाहता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना "राजसाहेब' करून टाकले. शिवसेनेतील काही नेत्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली होती; पण बाळासाहेब ठाकरे यांनी थेट शिवसेनाप्रमुखपद सोडण्याचा इशारा दिला आणि सर्व शिवसैनिकांच्या विनंतीवरून नंतर ते पद स्वतःकडे ठेवले. या एका तडाख्यात त्यांनी शिवसेनेवरील आपली पकड भक्कम केलीच; पण त्याचबरोबर राज यांनाही प्रस्थापित करून टाकले. राज यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेची घोडदौड सुरू होती. मुंबई-पुण्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून राजने आपले संघटनकौशल्य दाखवून दिले होते. त्यातच रमेश किणी यांच्या खुनाच्या प्रकरणात त्यांचे नाव गोवले गेले. या सर्व कालावधीत त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते काय, अशीच चिन्हे वाटू लागली होती. याच काळानेच बहुधा राज यांना राजकारण कोणत्या थराला जाऊ शकते, याचा अनुभव दिला.
पुढे 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राज हा शिवसेनेच्या प्रमुख प्रचारकांपैकी एक होता. विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण राज्यात त्याने उभे केले होते. निवडून आल्यानंतर काही आमदारांनी "मातोश्री'बरोबरच "कृष्णकुंज'वर हजेरी लावण्यास प्रारंभ केला, तो याच काळात. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. बाळासाहेबांचा राजकीय वारसदार नक्की कोण, याची चर्चा पुन्हा सुरू झाली. मुंबई महापालिकेतील सत्तासूत्रे पाहता पाहता उद्धव यांच्या हातात गेली आणि राज यांची घुसमट सुरू झाली. पडद्यामागची धुसफूस हळूहळू माध्यमांच्या कानापर्यंत पोचू लागली होती. मध्येच कधी तरी रुसलेल्या राज ठाकरे यांची "समजूत'काढण्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. 2002 मध्ये राजनेच उद्धव ठाकरे यांचे नाव शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदासाठी सुचविले, तेव्हा तर सर्व काही आलबेल झाल्याचेच चित्र उभे राहिले.
मात्र, वस्तुस्थिती वेगळीच होती. 2004 मध्ये राज ठाकरे यांनी, "मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल,' असे जाहीर करून आपण निवडणुकीच्या राजकारणात उतरणार असल्याचे संकेत दिले आणि शिवसेना पुन्हा ढवळून निघाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राजच्या समर्थकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर उद्धव वेगाने शिवसेनवर पकड मिळविताना दिसले आणि राज काहीसे शांत. याच काळात त्यांचे नाव आले ते कधी तरी त्यांच्या परदेश वारीमुळे किंवा काही व्यावसायिक कारणांनी.
गेल्या वर्षी मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना सोडली. त्यानंतर ते नक्की काय करणार असे विचारले जाऊ लागले. कोणत्या तरी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जाण्यापेक्षा स्वतःचा पक्ष काढण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. "राजकीय पक्ष चालविण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते,' असेही त्याला ऐकविले गेले! वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी स्वतःच स्वतःला अपर्ण करणाऱ्या राज यांनी गेल्या वर्षभरात सातत्याने मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्रात परप्रांतीयांची दादागिरी चालवून घेणार नाही, या त्यांच्या भूमिकेवरून आता गदारोळ सुरू आहे. त्यांची भूमिका योग्य का अयोग्य, त्यांच्या भाषणाला जमणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होणार का, येत्या काळात त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे परिमाण देणार का.. या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल; पण सध्या तरी महाराष्ट्रातील राजकारण हे त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याभोवती फिरू लागले आहे, हे खरे.
-------------
पराग करंदीकर
Friday, May 23, 2008
Tuesday, May 20, 2008
अपयशी शेतकरी नेता
उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेली सुमारे 35 वर्षे शेतकऱ्यांवर "राज्य' करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली ती 1979 मध्ये दिल्लीत "बोट क्लब'वर झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आणि त्यांच्यात झालेल्या झटापटीमुळेच. देशाच्या राजकारणात त्यांनी स्थान मिळविले ते या मेळाव्यानंतरच.
टिकैत मूळचे उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील शिसौली या गावचे. सातव्या शतकामध्ये ठाणेसरचा राजा हर्षवर्धन याने टिकैत यांच्या घराण्याला बालियॉं खापचे प्रमुखपद बहाल केले असल्याचे इतिहास सांगतो. शिसौली आणि त्याच्या परिसरातील सुमारे शंभर खेडी ही आजही त्यांचे नेतृत्व मानतात. 1935 मध्ये जन्म झालेल्या टिकैत यांच्याकडे गावाचे चौधरीपण वयाच्या आठव्या वर्षी आले. वडिलांच्या निधनानंतर मोठा मुलगा या नात्याने टिकैत 1943 मध्ये गावाचे चौधरी बनले. वयाच्या 78 व्या वर्षीही तेच या गावाचे चौधरी आहेत. या "खाप' परिसरातील शेतकरी गेली शतकानुशतके या घराण्याचे नेतृत्व मान्य करीत आले आहेत. टिकैत यांचे वडील चौधरी असताना या गावकऱ्यांनी 1941 मध्ये पुन्हा एकदा ठराव मंजूर करून, चौधरी सांगतील त्याचप्रकारे वागण्याचा व त्यांनी मागितल्यास प्राणही देण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
उत्तर प्रदेशातील पश्चिम भाग हा संपन्न. चौधरी चरणसिंह यांनी आपले संपूर्ण राजकारण याच परिसरातील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर केले. जाटांचे प्रभावक्षेत्र असलेल्या या भागावर कोणाची पकड असते तो नेता दिल्लीमध्ये राजकारण करण्यात यशस्वी ठरतो, असे मानले जाते. स्वातंत्र्यानंतरच्या तीन दशकांत चौधरी चरणसिंह यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. जाटांसाठी हरियाना या राज्याची स्थापना झाल्यानंतरही उत्तर प्रदेशातील जाटांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व कमी झाले नाही, याचे कारण चरणसिंह हेच होते. त्यांच्यानंतर या भागाचे नेतृत्व करण्यासाठी टिकैत यांनी जोरदार प्रयत्न केले. जाट शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना आपले नेते मानले खरे; पण मतदानाची वेळ आली तेव्हा त्यांनी टिकैत यांच्याकडे पाठ फिरवली. चरणसिंह यांचे सुपुत्र अजितसिंह यांनाच त्यांनी आपले नेते मानले. याचेच कारण म्हणून टिकैत यांनी 1986 मध्ये "भारतीय किसान युनियन' स्थापन केल्याच्या दिवसापासून अजून एकदाही त्यांना आपला एकही खासदार संसदेमध्ये पाठविता आलेला नाही.
"बोट क्लब'वर आठ दिवस काही लाख शेतकऱ्यांना घेऊन मुक्काम करणाऱ्या टिकैत यांनी 1988 मध्ये तत्कालीन सरकारची झोप उडविली होती. "शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माघार घेतली जाणार नाही, शेतकऱ्यांच्या मालाला निश्चित भाव मिळाल्याशिवाय ते कोणाचेही ऐकणार नाहीत,' अशा त्यांच्या गर्जना क्षणभर का होईना; पण शेतकऱ्यांना सुखावून गेल्या होत्या. राष्ट्रीय राजकारणात त्यांना स्थान मिळविता आले नसले, तरीही शेतकऱ्यांमध्ये त्यांना आदराचे स्थान आहे. साधेपणा, बिनधास्त बोलणे, हुक्का पिणे या त्यांच्या गोष्टी शेतकऱ्यांना आवडतात. नव्वदच्या दशकात टिकैत यांनी देशातील शेतकऱ्यांचा नेता होण्याचे बरेच प्रयत्न केले. देशाच्या विविध राज्यांमध्ये असलेल्या शेतकरी संघटनांना एकत्र आणण्याची धडपडही त्यांनी केली; मात्र प्रत्येक वेळेस त्यांचा संशयी स्वभाव आडवा आला. कोणावरच विश्वास न टाकणाऱ्या या नेत्याने, प्रत्येक संघटनेच्या प्रमुखाकडे आपला प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले. त्यामुळे नंतर कोणीच त्यांच्यावर विश्वास टाकेनासे झाले.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबाबत जातिवाचक उल्लेख केल्यानंतर टिकैत या आठवड्यात बातम्यांमध्ये झळकले; मात्र त्यांची या वेळची प्रतिमा आधीपेक्षा वेगळी होती. कोणत्याही नेत्याला व्यासपीठावरून "चोर' म्हणण्याबाबत ख्याती असलेल्या टिकैत यांनी दिलगिरी व्यक्त करताना माध्यमांसमोर जोडलेले हात बरेच काही सांगून गेले. वयानुसार आता उमेद संपल्याचेच त्यांनी सूचित केले. इतिहासाच्या पानांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या टिकैत यांना राजकारणात यश का मिळाले नाही, याचे उत्तर मात्र आजपर्यंत कोणालाच मिळालेले नाही. कदाचित "शहाण्या' मतदाराने त्यांना दिलेली ही "शिक्षा' हेच त्यांचे वेगळेपण ठरावे.
---------------------------
----------------------
पराग करंदीकर
parag.karandikar@esakal.com
-----

खली "बली'
गेले काही दिवस माध्यमांमध्ये चर्चा आहे ती खलीची. अनेक वर्षे भारतात राहून "मिस्टर इंडिया' हा किताब दोन वेळा जिंकल्यानंतरही दुर्लक्षित राहिलेली एखादी व्यक्ती माध्यमांनी ठरविल्यास प्रसिद्धिझोताच्या मधोमध कशी येऊ शकते, याचे "खली' हे उत्तम उदाहरण. कोण आहे हा खली आणि त्याच्याबद्दल अचानक एवढे प्रेम का, हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होत आहे. हा अवाढव्य खली आहे तरी कसा?
तर तो मूळचा आहे हिमाचल प्रदेशमधला. दिलीपसिंग राणा हे त्याचे मूळ नाव. सात भावंडांच्या कुटुंबात एखाद्या मुलाकडे जितके लक्ष असते तितकेच लक्ष दिलीपकडे त्याच्या आईवडिलांचे होते. त्याचे आई वडील, त्याच्याइतके उंच नव्हते; पण त्याचे आजोबा मात्र त्याच्या धिराना गावामधील सर्वांत उंच व्यक्ती म्हणून माहिती होते. गरिबीमुळे दिलीपने आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी रस्त्यावर दगड फोडण्याचे काम सुरू केले. त्याला अभ्यासात फारशी गती नसल्याने आई-वडिलांनीही ते मान्य केले. धिप्पाड अंगकाठीमुळे या दगड फोडण्यामध्येही दिलीपकडे काम यायचे ते मोठा दगड फोडून त्याचे लहान तुकडे करायचे. त्याचे सहकारी मग या लहान तुकड्यांची खडी करायचे. या श्रमांनी त्याची अंगकाठी अधिकच भक्कम होत गेली आणि हळूहळू त्याची पावले आखाड्याकडे वळू लागली. एरवी अभ्यासासाठी कधीही शाळेकडे न फिरकणाऱ्या दिलीपला क्रीडा स्पर्धांच्या वेळी शाळेतून आवर्जून निमंत्रण यायचे. जिल्हा आणि राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या उंची आणि ताकदीच्या जोरावर काही सुवर्णपदकांची कमाई तो लीलया करायचा.
भुल्लर यांची कृपा
त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा लाभली ती, एका क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात, पंजाब पोलिस दलाचे प्रमुख एम. एस. भुल्लर यांची नजर त्याच्यावर पडल्यानंतर. हा मुलगा दगड फोडण्याचे काम करतो हे ऐकून ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी दिलीपला पंजाब पोलिसमध्ये शिपाई म्हणून भरती करून घेतले. दरमहा निश्चित पगार मिळू लागला आणि पोलिस दलातील चांगल्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शनही मिळू लागले. शरीरसौष्ठवाकडे लक्ष देण्यास त्याने सुरवात केली आणि 1997 मध्ये तो "मिस्टर इंडिया' म्हणून गौरविला गेला. त्यापाठोपाठच्या वर्षातही त्याने हाच किताब मिळविला; पण त्याची चर्चा फार झाली नाही. या किताबांनंतर त्याला बढती मिळून तो फौजदार झाला.
पंजाबमध्ये तरुणांनी त्याला डोक्यावर घेतले. अमेरिकेत गेल्यास त्याचे नशीब उघडेल, असे सांगून त्याच्या मित्रांनी त्याला अमेरिकेमध्ये पाठविले. व्यावसायिक व्यायामशाळेमध्ये तो दाखल झाला तो "रेस्टलर' बनण्यासाठी. "ऑल प्रो रेस्टलिंग'मध्ये 2000 मध्ये त्याने पदार्पण केले. पहिली लढत जिंकल्यानंतर त्याची दखल घेतली जाऊ लागली. 2001 मध्ये त्याचबरोबर सराव करताना ब्रायन आँग या कुस्तीगिराचे निधन झाले. त्यामध्ये दिलीपचा दोष आहे किंवा नाही, याच्यावरून बरेच रण माजले. त्यानंतर अमेरिकेतून दिलीप जपानमध्ये दाखल झाला. जपानमध्ये नव्याने सुरू झालेल्या व्यावसायिक कुस्ती स्पर्धेमध्ये त्याचे नामकरण "जायंट सिंग' असे करण्यात आले. त्याची "जायंट सिल्वा'बरोबरची जोडी ही व्यावसायिक कुस्तीमधील सर्वांत उंच आणि वजनदार जोडी होती. सव्वासात फूट सरासरी उंची आणि सरासरी चारशे पौंड वजन हे आकडेच सामान्यांना चक्रावून टाकणारे होते. जपानमध्ये मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. याच दरम्यान दिलीपने लग्नही केले. "टिपिकल' पंजाबी घरामध्ये वाढलेल्या हरमिंदर कौरने दिलीपला जपानमध्ये साथ दिली. 2002 मध्ये जायंट सिंग आणि जायंट सिल्वा यांच्यात एक लढत झाली आणि त्यामध्ये दिलीप पराभूत झाला. त्यानंतर तो पुन्हा मायदेशात परतला. 2004 मध्ये दिलीपला हॉलिवूडमधून "ऑफर' आली. "द लॉंगेस्ट यार्ड' नावाच्या चित्रपटातून तो झळकला आणि त्याच्या लोकप्रियतेची खात्री पटल्याने 2006 मध्ये त्याला "वर्ल्ड रेस्टलिंग एंटरटेनमेंट'ने निमंत्रित केले. या वेळेस त्याचे नामकरण "द ग्रेट खली' असे करण्यात आले होते.
कालीमातेपासून प्रेरणा
कालीमातेपासून प्रेरणा घेऊन आपण हे नाव घेतल्याचे खली सांगतो. तो अतिशय धर्मवेडा आणि भाविक आहे. एके काळचा गरीब खली आज त्याच्या गावातील सर्वांत श्रीमंत माणूस आहे. आता त्याने आपला मुक्काम जालंधरला हलविला असला, तरीही गावातील रस्ते, शाळा, व्यायामशाळा यांच्यासाठी तो सढळ हाताने खर्च करतो. जागतिक स्तरावर व्यावसायिक कुस्तीमध्ये नाव मिळविलेला खली, आशुतोष महाराजांचा भक्त आहे. दिसायला धिप्पाड असला, तरीही मनाने तो खूप निर्मळ आणि मितभाषी असल्याचे त्याचे परिचित सांगतात. अडचणीत असलेल्या कोणालाही मदत करण्यासाठी तो धावतो. आपल्याकडे चांगल्या मोटारी असाव्यात आणि त्या भरधाव चालवाव्यात असे त्याला वाटते; पण त्याच्या उंचीमुळे त्याला छोट्या गाड्यांमध्ये बसता येत नाही, ही त्याची अडचण आहे.
प्रारंभी त्याला इंग्रजीचा गंधही नव्हता. पण आता तो थोडेफार इंग्रजी बोलायला लागला आहे. अमेरिकेतील कुस्ती स्पर्धांत सहभागी झाल्याने त्याची आर्थिक स्थिती सुधारली असली, तरीही पंजाब पोलिसमधील नोकरी त्याने सोडलेली नाही. अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्यासही त्याने नकार दिला आहे. पंजाबी खाण्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या दिलीपला सात वर्षे अमेरिकेत राहूनही "फास्ट फूड' अजिबात आवडत नाही. खली हा शाकाहारी आहे, असे सांगितले जात असतानाच त्याला दररोज पाच लिटर दूध, दोन ते तीन किलो चिकन, एक किलो सुकामेवा आणि तीस ते चाळीस रोट्या असा आहार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. दारू आणि सिगारेट या व्यसनांपासून मात्र तो दूर आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक कुस्तीपटूंमध्ये आढळणाऱ्या अमली किंवा उत्तेजक पदार्थांपासूनही तो दूर आहे.
असा हा खली महिन्यापूर्वी भारतात परतल्यानंतर माध्यमांमधून त्याचा अचानक गवगवा सुरू झाला. बलवान खलीने उडविलेल्या खली"बली'मुळेच नोंद माध्यमांना घ्यावी लागत आहे, हेच खरे.
------------

Friday, May 2, 2008
अस्वस्थ राणे
गेले अनेक दिवस नारायण राणे अस्वस्थ आहेत. अस्वस्थता त्यांनी लपवून ठेवलेली नाही. मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा त्यांच्या गळ्यात पडणार अशा बातम्या आता हळूहळू सवयीच्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळेच कदाचित राणे यांच्या अस्वस्थतेमध्ये भरच पडली आहे. या पुढच्या काळात राणे नक्की काय पवित्रा घेणार याविषयी अनेक तर्क सुरू आहेत; पण राणे यांचा इतिहास आणि स्वभाव पाहता ते काही तरी धाडसी पाऊल उचलण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, असे म्हणतात. राणे मूळचे कोकणातले. घरची परिस्थिती बेताची. साहजिकच बालपण फार सुखात गेले नाही. कोकणातील प्रत्येक जण नशीब शोधण्यासाठी तेव्हा मुंबईची वाट पकडायचा. राणेही त्याला अपवाद नव्हते. 1960 च्या दशकामध्ये ते मुंबईत दाखल झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेल ते करण्याची जिद्द आणि कोणत्याही स्थितीमध्ये आपणच आपला उत्कर्ष साधायचा हा ध्यास घेऊन आलेला हा माणूस राज्याचा मुख्यमंत्री होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने चोख उत्तर दिले; पण मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या शहरातील मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरे यांच्या आक्रमक नेतृत्वाने त्या वेळच्या तरुणांना भुरळ घातली. राणे या युवकांपैकीच. भूमिपुत्रांसाठी काहीही करू शकते, ती शिवसेनाच या अढळ विश्वासाने राणे शिवसेनेत सैनिक म्हणून दाखल झाले, त्या घटनेला आता सुमारे 40 वर्षे झाली. बाळासाहेबांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपण कधीच कोणाचीही फिकीर न करता लढलो, प्रसंगी "राडे' केले, असे राणे यांनीच जाहीरपणे अनेक वेळा सांगितले आहे. आक्रमकपणाला शिवसेनेचे कोंदण मिळाल्यानंतर राणे वेगाने सत्तासोपानाच्या पायऱ्या चढले. "मातोश्री'वरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करायची एवढी एकच गोष्ट त्यांना बाळासाहेबांच्या जवळ घेऊन गेली. संपूर्ण देशात सक्षम कारभाराबद्दल गौरविल्या गेलेल्या "बेस्ट'चे अध्यक्षपद राणे यांना दोन वेळा मिळाले, ते ठाकरे यांच्यामुळेच. बेस्टच्या अध्यक्षपदाचा उपयोग त्यांनी आपल्या गावाकडच्या लोकांना नोकऱ्या देण्यासाठी केला. साहजिकच त्यांची लोकप्रियता वाढली. भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना 1990च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरली. कोकणातील अनेक मतदारसंघांमध्ये मुंबईतील अनेक नेत्यांना संधी मिळाली. राणे यांनी मालवणमध्ये काम त्यापूर्वीच सुरू केले होते. त्यामुळे राणे उभे राहिले आणि निवडूनही आले. श्रीधर नाईक प्रकरणात राणे यांचे नाव आले. त्या पाठोपाठ मुंबईमध्ये दंगल झाली. ही दंगल आणि भाजप-शिवसेनेने एन्रॉनबद्दल उठविलेले रान याच्यामुळे कॉंग्रेसला 1995 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशी यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले. त्याच वेळेस कोठेतरी राणे यांनी एक दिवस आपणही या खुर्चीत बसायचे याची खूणगाठ बांधली होती. पाच वर्षांच्या आमदारकीमध्ये राणे यांनी प्रशासन कसे चालते, याचा अनुभव घेतला होता. मनोहर जोशींच्या राजवटीत ते महसूलमंत्री झाले. साहजिकच त्यांचे शिवसेनेतील महत्त्वही वाढले होते. फक्त आपलाच मतदारसंघ नव्हे, तर संपूर्ण कोकणामध्ये विकासाची गंगा नेली, तर पुढच्या राजकारणामध्ये बालेकिल्ला तयार करण्यास मदत होईल, हे हेरून राणे यांनी कोकणात कामांचा धडाका लावला. त्यापूर्वी अनेक वर्षांमध्ये कधीही डांबर न पडलेले रस्ते अचानक गुळगुळीत झाले आणि मुंबईतील चाकरमान्यांबरोबरच कोकणातील मतदारही राणे यांच्या मागे उभा राहिला. रस्त्यांबरोबरच विविध प्रक्रिया प्रकल्प उभारून रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा सहकारातून राजकारण करण्याचा कित्ता राणे यांनी गिरविला. मनोहर जोशींना बदलण्याची चर्चा सुरू झाली, त्याच वेळेस राणे यांनी सर्व शक्तिनिशी मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न केले. अखेर शिवसेनेला राणे यांच्याशिवाय पर्यायच राहिला नाही. राणे यांच्या नेतृत्वाखालील सरकार युतीला पुन्हा सत्ता मिळवून देईल, असे चित्र त्या वेळेस उभे केले गेले. तसे मात्र झाले नाही; पण दीड वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राणे यांनी दाखविलेला धडाका मात्र राजकारणात केस पांढरे केलेल्यांनाही चकित करणारा होता. त्या पूर्वीच्या आपल्या प्रतिमेला छेद देत, प्रशासनावर पकड असलेला उत्तम नेता म्हणून त्यांनी मिळविलेला लौकिक आजही त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी उपयोगी पडत आहे. 2005 मध्ये राणे यांनी अचानक शिवसेना सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि शिवसेनेमध्ये हलकल्लोळ उडाला. छगन भुजबळ यांनी केलेल्या बंडाशी राणे यांच्या बाहेर पडण्याची तुलना केली गेली. शिवसेना सोडल्यानंतर राणे यांनी कॉंग्रेसचा रस्ता पकडला आणि आपल्या बरोबर आलेले आमदार राजीनामा देऊन पुन्हा निवडून येतील, असे जाहीर केले. या सर्व प्रकारामध्ये राणे यांना यश मिळाले. कोकणातील पोटनिवडणुकीमध्ये यश मिळवून त्यांनी शिवसेनेला खऱ्या अर्थाने धक्का दिला. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतानाच राणे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले गेले होते, असे सांगतात. त्याची पूर्तता गेल्या अडीच-तीन वर्षांत तरी झालेली नाही. आतापर्यंत त्यासाठीचे अनेक मुहूर्त काढले गेले. अनेक वेळा राणे यांच्या दिल्ली वाऱ्याही झाल्या; पण कॉंग्रेस संस्कृतीमध्ये होकाराचा अर्थ नक्की होकार असा कधी असतो आणि नसतो, हे मात्र अजूनही त्यांना कळलेले नाही. याच काळात अस्वस्थ असलेल्या राणे यांनी राज्यातील नेतृत्वावर उघडपणे हल्लाही चढविला; पण अजून तरी त्यांच्या हातात फार काही आलेले नाही. आता पुन्हा एकदा राणे भूकंप करणार असे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्यासाठीचा मुहूर्तही जाहीर झाला आहे. राणे यांनी रविवारपर्यंत काहीही बोलणार नाही, असे जाहीर करून एकप्रकारे वादळापूर्वीची शांतता निर्माण केली आहे. राणे नक्की काय करणार याबाबत कितीही अंदाज बांधण्यात येत असले, तरीही राणे यांच्याबाबत खात्रीने सांगता येईल अशी स्थिती नाही. बहुधा तीच राणे यांची ताकद आहे. त्याच्या जोरावर ते कोणाला लोळवणार हेच पाहायचे.
------------ पराग करंदीकर ---------------
------------ पराग करंदीकर ---------------
Labels:
maharashtra,
politicians in india,
politics,
profile
Subscribe to:
Comments (Atom)